आपल्या महाराष्ट्रबद्द्ल थोडक्यात माहिती

महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. स्थापनेचा वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके, 4 प्रशासकीय विभाग होते.सध्या स्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, 535 शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग आहेत


महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग*

कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.

 पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.

औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.

नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.



नैसर्गिक सीमा:-

 वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.

उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.

 ईशान्येस : दरेकासा टेकड्या.

पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.

दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.

पश्चिमेस : अरबी समुद्र.




 राजकीय सीमा व सरहद्द :

वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.

उत्तरेस : मध्यप्रदेश.

पूर्वेस : छत्तीसगड.

आग्नेयेस : आंध्र प्रदेश.

दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.





 राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे:

 गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुले

दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक

 मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया

छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली

आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड

गोवा : सिंधुदुर्ग





महाराष्ट्रचे भारतातील स्थान

भारतातील 29 राज्यांपैकी एक.
भारताच्या मध्यवर्ती भागात .

महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारी विशाल भूमी आहे.





 1. विस्तार

अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.

रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.

 2. आकार

व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.

 पाया – कोकणात व निमुळते टोक विदर्भात.

3. लांबी, रुंदी व क्षेत्रफळ

 लांबी = पूर्व – पश्चिम – 800 किमी.

 रुंदी = दक्षिण – उत्तर – 720 किमी.

 क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.

 क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्येप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.

महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
 समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.





जिल्हे निर्मिती :


1. 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
                   
 औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

2. 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),
 
26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

3. 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

4. 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
                     
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

5. 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
                   
भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)

 6.1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा).






 महाराष्ट्राची प्राकृतिक रचना


महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग

 1. कोकण किनारपट्टी

2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट

 3. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी





1 कोकण किनारपट्टी

स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.

 विस्तार: उत्तरेस - दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.

लांबी:  दक्षिणोत्तर = 720 किमी,  रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.

क्षेत्रफळ: 30,394 चौ.किमी.





 2  सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट

स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.

यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.

 पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी - अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.






महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश

स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.

लांबी-रुंदी:  पूर्व- पश्चिम - 750km. उत्तर- दक्षिण - 700km.

 ऊंची:  450 मीटर- या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.

 महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे.

No comments:

Post a Comment