Airplane mode चे महत्व.

विमानात बसल्यावर मोबाईल Airplane Mode वर का सेट करावा लागतो?
आजकाल कुठेही गेलात की तुम्हाला Data किंवा Wifi चीनितांत आवश्यकता असते, जेणेकरून तुम्ही फेसबुकवर काही वेळ घालवू शकता. काही लेटेस्ट न्यूज पाहू शकता, जगभरातील अपडेट मिळवू शकता आणी खूपच कंटाळा आला तर ऑनलाईन मुव्हीज पाहू शकता किंवा म्युजिक ऐकू शकता. पण विमानात बसल्यावर मात्र या सर्व गोष्टींना मुकावं लागतं.आजही विमानामध्ये बसल्यावर तुमच्याजवळ असलेले सर्वइलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तुम्हाला एकतर बंद करावे लागतात किंवा Airplane Mode वर सेट करावे लागतात.तसा नियमच आहे आणी त्या नियमाचे प्रत्येक प्रवाश्याला पालन करावेच लागते. त्यामुळे Data काय किंवा Wifi काय कशाचाच वापर करता येत नाही. (आतासं कुठे काही विमान कंपन्यांनी विमानात Wifi देण्यास सुरुवात केली आहे.)


अश्या वेळी मनात प्रश्न येतो की तंत्रज्ञान एवढ सुधारलंय, फ्लाईट टेक्नोलॉजी अतिशय प्रगत झाली आहे, मग तरीही अजून या Airplane Mode वर उपाय का निघत नाही? मोबाईल जर Airplane Mode वर नाही ठेवला तर कुठे बिघडतं? चला तर आज या प्रश्नामागचं उत्तर आज जाणून घेऊया.खरतरं ही गोष्ट प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे. एक असा समज होता की मोबाईल सुरु ठेवल्यास त्यातून निघणाऱ्या frequencies (लहरी) विमानाच्या यंत्रणेमध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे विमान कोसळून त्याला अपघात होतो.  पूर्वी अश्या काही विमान दुर्घटना घडल्यामुळे असा अंदाज बांधण्यात आला होता. परंतु हा अंदाज चुकीचा ठरला. अधिकच्या निरीक्षणातून असे लक्षात आले की फोन/मोबाईल सिग्नल हे radio frequency मध्ये अडथळा आणू शकतात/आणतात. ही गोष्ट वारंवार घडत नाही पण जेव्हा घडते तेव्हा भयंकर परिणाम सोबत आणू शकते.


radio frequency च्या माध्यामातूनच पायलट आणि एयरट्राफिक कंट्रोल एकमेकांशी संवाद साधत असतात. तसेच अतिशय महत्वपूर्ण माहितीची देवाण घेवाण करत असतात. पण फोन सिग्नल मुळे निर्माण होणाऱ्या, डोकं दुखावणाऱ्या आवाजामुळे त्यांना एकमेकांशी संवाद साधणे कठीण होऊन बसते. अश्यावेळेस केवळ काही सेकंदासाठी जरी त्यांचे बोलणे तुटले तरी ते धोकायादक ठरू शकते.


तसेच विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी जर त्यांच्या मोबाईल Airplane Mode सेट केला नाही तरमोठ्या प्रमाणात Radio Pollution देखील होते.

No comments:

Post a Comment